स्वातंत्र्यपूर्व सातारा परिसराच्या आर्थिक प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा अभ्यास
Keywords:
साताराAbstract
सातारा आणि परिसरामध्ये अनेक व्यक्तींनी आर्थिक विकासात महत्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटीश कालखंडात बदलत्या परिस्थितीत औद्योगिकरणाला प्रारंभ होत असताना लहान-मोठ्या उदोगांची सुरुवात केली. या व्यक्तींनी केवळ उद्योगधंद्यांची स्थापना केली नाही, तर स्थानिक समाजरचनेत आर्थिक परिवर्तन घडवून आणले. छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी शिक्षण, संस्कृती आणि प्रशासनाच्या माध्यमातून आर्थिक घडामोडींना चालना दिली. वासुदेव गणेश चिरमुले यांनी उद्योग, विमा आणि व्यापार क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले. धनजीशा कूपर यांनी यंत्रसामग्री व अभियांत्रिकी उद्योग सुरू करून औद्योगिकीकरणाला नवी दिशा दिली. याचप्रमाणे विश्वनाथ नारायण चिपळूणकर यांनी तंबाखू उद्योगात उल्लेखनीय यश संपादन केले, तर मो. ना. आगाशे यांनी आयुर्वेदीय औषधनिर्मिती क्षेत्रात साताऱ्याचे नाव देशभर पोहोचविले. आधुनिक औद्योगिक युगात डॉ. निळकंठराव कल्याणी यांनी अभियांत्रिकी व उत्पादन क्षेत्रात मोठे योगदान देऊन साताऱ्याच्या औद्योगिक विकासाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. या सर्व व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास केल्यास साताऱ्याच्या आर्थिक इतिहासातील परिवर्तनाची दिशा स्पष्ट होते. त्यांनी उभारलेले उद्योग, निर्माण केलेल्या संधी आणि दिलेले रोजगार यांमुळे स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम झाली. या शोधनिबंधात त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक व उपयुक्त ठरते.